भोसले पॉलीटेक्निकचे राज्यस्तरीय टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन मध्ये सुयश

भोसले पॉलीटेक्निकचे राज्यस्तरीय टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन मध्ये सुयश

*कोकण Express*

*भोसले पॉलीटेक्निकचे राज्यस्तरीय टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन मध्ये सुयश*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने ठाणे येथील थीम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. कॉलेजच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ मोबाईल ऑपरेटेड इलेक्ट्रिक वायर कटिंग मशीन’ या सादरीकरणाला द्वितीय क्रमांकाचे रु. १० हजार रोख पारितोषिक मिळाले. मेकॅनिकलचे विद्यार्थी यश परब, कैफ कुरेशी, तनिष सावंत, पार्थिव तळवणेकर, पुरुषोत्तम वंजारी व राज कळसुलकर यांनी प्रा. पुष्कर परब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुयश प्राप्त केले. विद्याथ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावतभोसले, प्राचार्य गजानन भोसले व विभाग प्रमुख अभिषेक राणे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!