हातिवले टोलमधून मिळणारा फायदा नारायण राणेंच्याच खिशात जाणार- रुपेश नार्वेकर

हातिवले टोलमधून मिळणारा फायदा नारायण राणेंच्याच खिशात जाणार- रुपेश नार्वेकर

*कोकण Express*

*हातिवले टोलमधून मिळणारा फायदा नारायण राणेंच्याच खिशात जाणार- रुपेश नार्वेकर*

*टोलमाफी शिवाय सिंधुदुर्गात टोलनाका सुरु करण्याचा नारायण राणेंचा डाव साधू देणार नाही*

निलेश राणेंनी बंद केलेला हातिवले येथील टोलनाका पुन्हा कसा सुरु झाला. टोलनाका सुरु होऊनही राणे गप्प का राहिले. एकीकडे टोलला विरोध करायचा आणि दुसरीकडे टोलनाक्याचे टेंडर मिळवायचे हि नारायण राणेंची दुटप्पी भूमिका जनतेला आता माहित झाली आहे.नाव राणेंचे नसले तरी हातिवले टोलनाक्याचे टेंडर हे नारायण राणेंनी स्वतःसाठीच मिळविले आहे. टोलमधून मिळणारा फायदा नारायण राणेंच्याच खिशात जाणार आहे. या सत्यपरिस्थितीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केलेली टीका नारायण राणेंना पचली नसल्यानेच राणेंनी आपल्या लोंबत्या असलेल्या बंडू हर्णे यांना संदेश पारकर यांच्यावर वैयक्तीक टीका करण्यास भाग पाडले.मात्र सिंधुदुर्ग वासियांना टोलमाफी मिळाल्याशिवाय नारायण राणेंचा ओसरगाव टोलनाका सुरु करण्याचा डाव संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना साधू देणार नाही असा इशारा शिवसेना नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी दिला आहे.
एकेकाळी बंडू हर्णे हे संदेश पारकर यांचेहि लोंबतेच होते हे त्यांनी विसरू नये. मात्र मध्यंतरी राणेंनी नगराध्यक्ष पदाचे आमिष दाखविल्यानंतर त्या अमिषाला भुलून बंडू हर्णे आता राणेंचे लोंबते झाले आहेत. बंडू हर्णे यांची नगराध्यक्ष होण्याची इच्छा नारायण राणे पुढील निवडणुकीत पूर्ण करतील अशी बंडू हर्णे यांना आशा आहे. म्हणूनच राणेंवर केलेली टीका बंडू हर्णे यांना झोंबते. मात्र त्यांची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही.
तसेच संदेश पारकर आपला वाढदिवस विविध सामाजिक, संस्कृतीक, शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करतात. याचा पोटशूळ बंडू हर्णे यांना होत आहे. मात्र संदेश पारकर सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करतात तसा बंडू हर्णे यांनी आपला एकतरी वाढदिवस साजरा करून दाखवावा असे आवाहन रुपेश नार्वेकर यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!