*कोकण Express*
*ओटवणे येथील जादूगार वैभवकुमार यांचा जादू विशारद पुरस्काराने गौरव….*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
ओटवणे गावचे सुपुत्र जादुगार वैभवकुमार यांना नुकत्याच पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जादू परिषदेत जादू विशारद व जादू भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे..
जादूगार वैभव कुमार यांनी महान जादूगार बनण्यासाठी भारतात जिथे जिथे जादूचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी सुरत, बंगलोर, हैद्राबाद, सिकंदराबाद, मुंबई, पुणे, गोवा सारख्या देश विदेशातील जादू तज्ञाकडून जादूचे वर्कशॉप असतील तिथे जाऊन विद्या संपादन केली. आता त्यांना परदेशात जाऊन पुढील शिक्षण घ्यायचे असून परदेशात देखील जादूचे कार्यक्रम करून सिंधुदुर्गाचे नाव उज्वल करायचे आहे. जादूगार वैभव कुमार यांना घडवण्यासाठी जादूचे शिक्षक जागतिक प्रशिक्षक सतीश देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच रत्नागिरीतील जादूगार कस्तुरे आणि विनय राज, अवधुत तसेच ऑल इंडिया मॅजिशियन ग्रुपचे पण त्यांना सहकार्य केले. आजवरच्या त्यांच्या यशस्वी कारकीर्दीत त्यांनी अंध अपंग तसेच वृद्धाश्रम व ज्येष्ठ नागरिक यांच्या संस्थेसाठी विनामूल्य कार्यक्रम करून सामाजिक योगदान दिले. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी जादूतून अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञानातून जादू, भोंदू बाबांचे चमत्कार या विषयातून जादू दाखवून समाज जागृतीचे कार्य केले. पाच वर्षाच्या मुलापासून ते नवोदितल्या ज्येष्ठ ना आवडणारे ते मनमिळाऊ जादूगार म्हणून प्रसिद्ध आहे. आज अनेक संस्थांनी त्यांना मानपत्र मानचिन्ह देऊन सन्मानित केले. महाराष्ट्र अपंग मित्र फेलोषिप संस्था, ग्लोबल मालवणी संस्था मुंबई विद्यार्थी विकास प्रशिक्षण अकॅडमी तर्फे राष्ट्रीय युवा जादुगार पुरस्कार इंटरनॅशनल ह्यूमन राईट, जस्टिस फेडरेशन संस्थेतर्फे महाराष्ट्र लोक गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार आजवर मिळाले तसेच जिव्हाळा सेवाश्रम ट्रस्ट, भीमगर्जना बौद्ध मंडळ अशा महाराष्ट्र गोवा कर्नाटकातील अनेक संस्थांनी त्यांना आजवर सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मान केला.

