*कोकण Express*
*हडपिड स्वामी समर्थ मठात नामस्मरण सप्ताहाचा प्रारंभ*
*देवगड ःःप्रतिनिधी*
श्री. स्वामी समर्थ मठ हडपिड देवगड येथे स्वामी पुण्यतिथी निमित्त १२ एप्रिल पासुन १८ एप्रिल २०२३ पर्यंत साप्ताहिक नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नामस्मरणासाठी पंचक्रोशीतील अनेक भक्त सहभागी होत आहेत.
श्री. स्वामी समर्थ मठ हडपिड देवगड तर्फे प्रथमच हा सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी स्वामी भक्त आनंदाने सहभागी होत आहेत. श्री. स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडच्या वतीने सर्व स्वामी भक्तांचे अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर व गांव समितीने आभार मानले आहेत.

