पर्यटन महोत्सवानिमित्त स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमासाठी नियोजन बैठक

पर्यटन महोत्सवानिमित्त स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमासाठी नियोजन बैठक

*कोकण Express*

*पर्यटन महोत्सवानिमित्त स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमासाठी नियोजन बैठक*

*नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली नगरपंचायत आयोजित पर्यटन महोत्सव ५ जानेवारी ते ८ जानेवारी २०२३ रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोर होणार आहे. त्यानिमित्त ६ जानेवारी रोजी शहरातील व जिल्ह्यातील नवोदित आणि नामवंत २०० कलाकारांच्या संचात ३ तासांचा स्टेज शो होणार आहे. या कार्यक्रमात गायन, वादन, नृत्य, अभिनय, मिमिक्री, स्किट आणि इतर कलाप्रकार यांचे सादरीकरण होणार आहे. तरी इच्छूक कलाकारांनी ४ डिसेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता नगरवाचनालय हॉल दुसरा मजला कणकवली येथे हजर राहावे. अधिक माहितीसाठी सुहास वरूणकर ८६००२४९६२४, प्रा. हरिभाऊ भिसे 9422633023, संजय मालंडकर 9422394222 यांच्याशी संपर्क साधावा. कार्यक्रम सुरळित पार पाडणे, रूपरेषा ठरवणे, कलाकर सहभाग या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!