डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत आर पी डी च्या योगेश जोशी यांनी पटकावले सुवर्णपदक

डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत आर पी डी च्या योगेश जोशी यांनी पटकावले सुवर्णपदक

*कोकण Express*

*डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत आर पी डी च्या योगेश जोशी यांनी पटकावले सुवर्णपदक…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

मुंबई विज्ञान अध्यापक मंडळामार्फत आयोजित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त सहावीतील विद्यार्थी योगेश विवेकानंद जोशी याने कोल्हापूर विभागातून सुवर्णपदक प्राप्त केले आहे त्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीतर्फे संस्थेचे अध्यक्ष विकासभाई सावंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, संचालक अमोल सावंत, चंद्रकांत सावंत, सौ. व्ही. एन. मुळीक, सौ. छाया सावंत, योगेश जोशीचे आई – वडिल नवनिर्वाचित संचालक सतिश बागवे उपमुख्याध्यापक शेखर नाईक माजी मुख्याध्यापिका सोनाली सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

सत्कारप्रसंगी बोलताना योगेशने या स्पर्धेसाठी युरेका संस्थेच्या श्रीमती सुषमा केणी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले तसेच एस. पी. के. कॉलेजचे प्रा. डॉ. देठे, प्रा. डॉ. गणेश मर्गज, डॉ. शिवराम पई आर. पी. डी. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. जगदिश धोंड शिक्षक श्री. दशरथ शृंगारे, श्री. प्रल्हाद सावंत व आपले आई – वडिल यांचेही मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले या स्पर्धेत सुमारे ३७ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

लेखी, प्रात्यक्षिक, प्रकल्प व मुलाखत अशा चार टप्प्यात ही स्पर्धा होते त्यातून ०.७५% विद्यार्थी हे बक्षिसपात्र ठरतात योगेशने ‘देवत्व देऊन राखीव ठेवलेली झाडे’ या विषयावर प्रकल्प केलेला होता यासाठी त्याने माजगाव, ओटवणे, कारिवडे, शिरशिंगे, वेर्ले, शेर्ले, असनिये, तांबुळी इत्यादी गावांना भेटी देऊन तेथील, झाडांचा अभ्यास केला होता सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण ठाणे येथे के. इ. एम. हॉस्पिटलचे रेडी ऑलॉलिस्ट डॉ. सतिश पांडे यांचे हस्ते झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!