*कोकण Express*
*फोंडाघाट गावात शिवसेनेचा भाजपला दे धक्का…*
*शिवसेना जि.प. सदस्य संजय आग्रेंची फोंडाघाटमध्ये राजकीय उलथापालथ
*कणकवली ः प्रतिनिधी*
19 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या फोंडाघाट विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीच्या आधीच शिवसेनेचे माजी जि.प. सदस्य संजय आग्रे यांनी भाजपला धक्का दिला असून संजय आग्रे यांच्या नेतृत्वाखाली माजी सभापती संदेश पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत फोंडाघाट गांगोवाडीतील भाजपाच्या 21कार्यकर्त्यानी व कोरगावकर वाडीतील हेमंत कोदे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. गांगोवाडीतील गणेश लाड, सूर्यकांत लाड, पांडुरंग लाड, गोरक्षनाथ लाड, विनायक लाड, समीर लाड, अनिकेत लाड, आदित्य लाड, तुषार लाड, संतोष चव्हाण, संतोष बागवे, नामदेव लाड, शुभम लाड, सर्वेश चव्हाण संतोष लाड, जगन्नाथ लाड, गौरव लाड, संदीप बागवे, चेतन गावकर, रोहिदास लाड, विजय लाड, दीप लाड यांनी आज शिवसेनेचा भगवा हाती घेतला.फोंडाघाट सोसायटी निवडणूक येत्या 19 एप्रिल रोजी होत आहे. फोंडाघाट सोसायटी निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा पुरस्कृत पॅनेल अशीच लढत असणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पं स निवडणुकांपूर्वीची ही शेवटची निवडणूक असल्यामुळे दोन्ही पक्षाकडून फोंडाघाट सोसायटी निवडणूक प्रतिष्ठेची केली जाणार आहे.या पार्श्वभूमीवर संजय आग्रे यांनी आज भाजपला धक्का देत गांगोवाडीतील सक्रिय भाजपा युवा कार्यकर्त्यांचा आणि कोरगावकर वाडीतील हेमंत कोदे यांचा शिवसेनेत प्रवेश घेतला. स्थानिक वैयक्तिक जनमत बाजूने असलेल्या हेमंत कोदे यांचा शिवसेनाप्रवेश हा सोसायटी निवडणुकीपूर्वी सेनेला बळकटी देणारा ठरणार आहे.ऐन निवडणुकीआधीच सुरू झालेल्या या राजकीय उलथापालथीमुळे फोंडाघाट खळबळ माजली आहे. यावेळी रंजन चिके, आनंद मर्ये, राजन नानचे, राजेश शिरोडकर, ध्रुव गोसावी, विनोद सावंत ,भालचंद्र सावंत, विठ्ठल लाड, शाम भोवड, बंटी उरणकर, राजन कोथंबीरे निलेश भोगले, शेखर लिंग्रज, अण्णा पारकर आदी उपस्थित होते.

