*कोकण Express*
*श्री देव कोळंबा जत्रा 8 मे रोजी*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्री देव कोळंबा जत्रा सालाबादप्रमाणे रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी होणार आहे.
कार्यक्रम सकाळी 8 ते 9 पुजाविधी ,सकाळी 9 ते 2 मागील नवस फेड करणे ,2 पासून नविन नवस बोलणे व 4 ते 8 पर्यंत महाप्रसाद असा धार्मिक कार्यक्रम होणार असून कोरोना पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन जत्रा होणार आहे तरी सर्व भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी केले आहे.

