*कोकण Express*
*फोंडाघाट एस. टी. बस स्थानक परिसराची स्वच्छता*
*राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमा अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय, फोंडाघाट ता. कणकवली, यांच्या वतीने मंगळवार दिनांक ४ जानेवारी रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. फोंडाघाट एस. टी. बसस्थानक परिसरातील स्वच्छता त्याचप्रमाणे कोरोना जनजागृती आणि रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहन धारकांनी वाहन चालवितानाचे नियम याबाबत कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाटच्या राष्ट्रीय सेवा योजना गटात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग मोहिते, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख मयूर धुमाळे, प्रा. राहुल गोंधळी, डॉ. मनीषा अपराज, डॉ. अमृता जंगले, प्रा. विश्रांती गवळी, प्रा. श्वेता मयेकर यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटचे शिक्षक जगदीश राणे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

