*कोकण Express*
*रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद*
*५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आज दि. २१ ऑगस्ट रोजी रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर जि. प. सदस्या स्वरूपा विखाळे, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रा. प. सदस्य संदिप मेस्त्री, ग्रा. पं. सदस्या सायली पवार, जांभवडे हायस्कुल चेअरमन सुभाष मडव, शशिकांत रगजी, शांताराम नाईक, नगरसेवक महेंद्र सांबरेकर, एकनाथ मडव, दत्ताराम मडव, चंद्रकांत तेली, डॉ. सागर पटेल आदी उपस्थित होते.
भारतामध्ये रक्तदानाचे प्रमाण खूप कमी असून रुग्णांची गरज लक्षात घेता रक्तदानाचे प्रमाण वाढले पाहिजे, असे प्रतिपादन कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी केले आणि शिबिरास शुभेच्छा दिल्या.
रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरास दोन महिला रक्तदात्यांसह ५८ रक्तदात्यांनी हजेरी लावली होती. त्यापैकी ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर ६ रक्तदाते तांत्रिक कारणास्तव रक्तदान करू शकले नाहीत.
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रामदास विखाळे, अमोल भोगले, कणकवली नगरसेविका कविता राणे, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, स्वाती राणे, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, अनिल खोचरे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी कणकसिंधु वस्तीस्तर संघाच्या महिलांनी रक्तदात्यांना रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राखी बांधून अनोखा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार पावसकर, सर्वेश राणे, योगेश जाधव, केतन दळवी, संदेश पावसकर, अभिषेक नाडकर्णी, सुशिल परब, माणिक वाघमारे आदींनी प्रयत्न केले.
