*_सुधारित_* *_क्षेत्रिय अधिकारी व क्षेत्रिय पोलिस अधिकारी प्रशिक्षण संपन्न_* *क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडावी* *-जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील* *_•कामाचे नियोजन करा_* *_•प्रत्येक काम वेळेत पूर्ण करा_* *_•केलेल्या कामाचा नियमित अहवाल सादर करा_* सिंधुदुर्गनगरी, दि. ०४ (जिमाका) निवडणूक प्रक्रीयेदरम्यान क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांची भूमिका महत्वाची असते. निवडणुकीच्या कालावधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक कामाचे नियोजन करुन ते काम वेळेत पूर्ण करणे करावे, केलेल्या कामांचा नियमित अहवाल देणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रीयेदरम्यान क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी दिले. नियोजन सभागृहात क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, हेमंत निकम, उपजिल्हाधिकारी श्रीमती देसाई तसेच तहसिलदार आणि क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, प्रत्येक क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांनी आपआपसात समन्वयाने काम करावे, प्रत्यक्ष मतदान केंद्राला भेट देऊन सर्व पाहणी करावी, देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची पडताळणी करावी, निवडणूक प्रक्रियेदरम्यान करावयाच्या कामांचे सुक्ष्म नियोजन करावे, प्रत्येक काम वेळेत आणि चोख पणे पार पाडावे असेही ते म्हणाले. श्री अग्रवाल यांनी उपस्थितांना कायदा व सुव्यवस्था कशा प्रकारे राखावी याबाबत मार्गदर्शन केले. मतदानाच्या पूर्वी, मतदानाच्या दिवशी आणि मतदान झाल्यावर क्षेत्रीय पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी काय असते आणि ती कशा प्रकारे पार पाडायची याबाबत सखोल मार्गदर्शन केले. श्री रावले यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. क्षेत्रीय पोलिस अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचा अभ्यास करावा, त्या सूचनांचे तंतोतंत पालन कशा प्रकारे करावे याबाबत सविस्तर माहिती दिली. श्री शेवाळे यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्राथमिक कर्तव्ये, मतदान पूर्व जबाबदारी व कर्तव्ये, Vulnerabillty Mapping म्हणजे काय, निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात कशा प्रकारे घ्याव्यात, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी VM बाबत DEO यांना द्यावयाची माहिती, मतदान केंद्रनिहाय Vulnerabillty ठरविण्यासाठी नमुना, मतदान दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी करावयाची कामे, मतदानाच्या दिवशी करावयाची कामे आदी विषयांची माहिती प्रशिक्षणादरम्यान सविस्तर रित्या देण्यात आली. ००० ०००

*कोंकण Express* *_क्षेत्रिय अधिकारी व क्षेत्रिय पोलिस अधिकारी प्रशिक्षण संपन्न_* *क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडावी* *-जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील* *_•कामाचे नियोजन करा_* *_•प्रत्येक

Read More

मालवण हडी कोतेवाडी येथील श्री गणपती मंदिरास फ्लडटाइप सोलर लाईट भेट*

*कोंकण Express* *मालवण हडी कोतेवाडी येथील श्री गणपती मंदिरास फ्लडटाइप सोलर लाईट भेट* सन्मामनीय मनसे देवगड संपर्क अध्यक्ष *श्री नितीनजी पवार साहेब* यांच्या सौजन्याने मनसे

Read More

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून खासदार नारायण राणे यांनी १६ कोटी २९ लाख रुपयांचा दिला निधी

*कोंकण Express* *पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून खासदार नारायण राणे यांनी १६ कोटी २९ लाख रुपयांचा दिला निधी* *सिंधुदुर्गातील सहा महत्त्वाचे रस्ते मंजूर* *खासदार नारायण राणे यांच्या

Read More

राजकोट किल्ला शिवप्रेमी जनतेसाठी खुला करावा :-विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ

*कोंकण Express* *राजकोट किल्ला शिवप्रेमी जनतेसाठी खुला करावा :-विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ* *पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील यांची घेतली

Read More

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील *वग महाराष्ट्राचा* या नाट्याचा शनिवारी सकाळी 9.30 वा. सावंतवाडीत प्रयोग*

*कोंकण Express* *खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील *वग महाराष्ट्राचा* या नाट्याचा शनिवारी सकाळी 9.30 वा. सावंतवाडीत प्रयोग* *सावंतवाडी ः प्रतिनिधी* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी –

Read More

*रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय माजी खासदार तथा शिवसेना नेते माननीय श्री. विनायकजी राऊत साहेब यांचा सिंधुदुर्ग दौरा…*

*कोंकण Express* *रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय माजी खासदार तथा शिवसेना नेते माननीय श्री. विनायकजी राऊत साहेब यांचा सिंधुदुर्ग दौरा…* *शनिवार दि. 05 ऑक्टोबर

Read More

*५ ऑक्टोबर रोजी गोपुरी आश्रमात प्राचार्य कॉम्रेड आनंद मेणसे यांचे ‘समजून घेऊ महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर जाहीर व्याख्यान*

*कोंकण Express* *५ ऑक्टोबर रोजी गोपुरी आश्रमात प्राचार्य कॉम्रेड आनंद मेणसे यांचे ‘समजून घेऊ महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर जाहीर व्याख्यान* म.

Read More

आंबा, काजू पिक विमा रक्कम न मिळाल्याने महाविकास आघाडीचे ९ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन – सतीश सावंत

*कोंकण Express* *आंबा, काजू पिक विमा रक्कम न मिळाल्याने महाविकास आघाडीचे ९ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन – सतीश सावंत* *कणकवली ः प्रतिनिधी* सन २०२३- २४

Read More

अनिकेत तर्फे जिल्हा अध्यक्ष तर ज्ञानेश्वर मोरे जिल्हा संपर्क अध्यक्ष

*कोंकण Express* *अनिकेत तर्फे जिल्हा अध्यक्ष तर ज्ञानेश्वर मोरे जिल्हा संपर्क अध्यक्ष* महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी श्री .अनिकेत अनंत तर्फे

Read More

सावंतवाडी मतदारसंघातील सर्व कामे पूर्ण….

*कोंकण Express* *सावंतवाडी मतदारसंघातील सर्व कामे पूर्ण….* *जागेचा प्रश्न न सुटल्यास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची जागा बदलावी लागेल शिक्षण मंत्री दीपक केसरकर…* *सावंतवाडी ः प्रतिनिधी* चौकुळ, आंबोली,

Read More

error: Content is protected !!