व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्राधान्य देणार : सतीश सावंत

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्राधान्य देणार : सतीश सावंत

*कोकण Express*

*व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्राधान्य देणार : सतीश सावंत…*

*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचा 67 वा वर्धापन दिन…*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध करून देणे ही आम्हा सर्व संस्था चालकांची जबाबदारी आहे. 2004 मध्ये सुरू केलेल्या विज्ञान शाखेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना करिअरची संधी उपलब्ध झाली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान किती मिळते हे महत्वाचे आहे. येत्या काळात संस्थेच्या माध्यमातून व्यवसायिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन कण्यात आले होते. संस्था अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच वृक्षारोपणाने वर्धापन दिन साजरा करण्यात आला. संचालक संजय सावंत, शालेय समितीचे खजिनदार गणपत सावंत, सदस्य नितीन सावंत, तुषार सावंत, बावतीस घोन्साल्विस, प्रभाकर चांदोस्कर, मुख्याध्यापक- प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, माजी मुख्याध्यापक आर.एच.सावंत, ए.एस. सावंत, अनाजी सावंत, अजित सावंत आदी उपस्थित होते.
सतीश सावंत म्हणाले, या शिक्षण संस्थेत सेवा करण्याची संधी आमच्या त्याकाळातील शिक्षणप्रेमी संस्थापकांमुळे मिळत आहे. त्यांना अभिवादन करताना अतिशय दुरदूष्टी राखत ही संस्था स्थापन करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचे आम्ही सदैव ऋणी आहोत. प्रशालेचा परिसर विविध वृक्षांमुळे समृध्द होत असून त्याची आवड विद्यार्थ्यांमध्येही निर्माण होत आहे. येत्या काळात संस्था पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी व हितचिंतक यांनी सांघिक कामातून या संस्थेचा विस्तार होण्यासाठी कटीबध्द होवूया असे आवाहन केले. शिक्षण संस्थेच्या वाटचालीचा आढावा खजिनदार गणपत सावंत यांनी घेतला. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुमन दळवी तर सूत्रसंचालन प्रसाद मसुरकर यांनी केले. प्रशालेच्या आवारात विविध झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!