जिल्ह्यातील सरपंचासह कृती समितीतील सदस्यांना सुद्धा विमा संरक्षणाचा लाभ द्या!

जिल्ह्यातील सरपंचासह कृती समितीतील सदस्यांना सुद्धा विमा संरक्षणाचा लाभ द्या!

*कोकण Express*

*जिल्ह्यातील सरपंचासह कृती समितीतील सदस्यांना सुद्धा विमा संरक्षणाचा लाभ द्या!*

*आंबोली ः प्रतिनिधी*

जिल्ह्यातील सरपंचांना देण्यात आलेल्या विमा संरक्षणाचे स्वागत असून सरपंचासह कृती समितीतील सदस्यांनादेखील विमा संरक्षणाचा लाभ द्यावा, अशी मागणी आंबोली भाजपा तथा माजी ग्रा. पं. सदस्य संतोष पालेकर यांनी केली आहे.

दरम्यान, जि. प. कडून जिल्ह्यातील ४२८ सरपंचानां विमा कवच देण्यात आल्याचे नुकतेच जाहिर करण्यात आले आहे. कोरोना काळात सरपंच ज्या प्रकारे चांगले कार्य करत सेवा देतात. त्याच प्रमाणे सरपंच यांच्या सोबत कृती समिती सदस्यदेखील जीवाची पर्वा न करता सेवा देत असतात. त्यामुळे सरपंचाना देण्यात आलेल्या विमा संरक्षणाचा लाभ कृती समिती सदस्यांनाही मिळावा. तर या मागणीचा सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी संतोष पालेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!