धुळे येथील वीर शिरोमणी महाराणा प्रताप पुतळा अनावरण आणि स्मारकाचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण

धुळे येथील वीर शिरोमणी महाराणा प्रताप पुतळा अनावरण आणि स्मारकाचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण

*कोकण  Express*

*धुळे येथील वीर शिरोमणी महाराणा प्रताप पुतळा अनावरण आणि स्मारकाचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण*

*राजपूत समाज बांधव व भाजपा पदाधिकारी यांनी केले आ. नितेश राणे यांचे जंगी स्वागत*

 कणकवली ः प्रतिनिधी*

धुळे महानगपालिकेने महाराणा प्रताप चौक येथे उभारलेल्या भव्य स्मारक, पुतळा अनावरण आणि सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे दौऱ्यावर आलेल्या लोकप्रिय आमदार नितेश राणे यांचे जिल्हा भाजपा पदाधिकारी व धुळे महानगरपालिका पदाधिकारी व राजपूत समाज यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे, माजी पर्यटन मंत्री आमदार जयकुमार रावल, धुळे महापौर चंद्रकांत सोनार, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल तसेच राजपूत समाज आणि धुळेवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!