*कोकण Express*
*सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृत्यूसंख्या वाढती असल्याने मुख्यमंत्रीसाहेब लक्ष द्या!*
*भाजपा माजी आमदार प्रमोद जठार यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष!*
*बीएचएमएस डॉक्टरांना तात्काळ कोविडच्या सेवेत सामावून घ्या!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सध्या कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून दिवसागणिक येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाने लोक मरताहेत, त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आता तरी गांभीर्याने घ्या, अशी मागणी भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर सिंधुदुर्ग मधील सदर परिस्थिती हाताळण्यासाठी येथे सुविधा उपलब्ध कराव्यात तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना योग्य ते निर्देश देण्याची मागणी श्री जठार यांनी केली आहे.
या निवेदनात श्री जठार यांनी म्हटले आहे, प्रत्येक तालुका ग्रामीण रुग्णालय , आरोग्य केंद्र तसंच नव्याने सुरु करण्यात आलेली सर्व कोविड सेंटर येथे त्वरीत मोबाईल ऑक्सीजन यंत्रणा बसवावी जेणेकरुन ऑक्सीजन अभावी कोणताही रुग्ण दगावणार नाही . सदर काम टेंडर प्रक्रियेमध्ये न अडकवता यावर युध्धपातळीवर उपाययोजना करणेत यावी.
प्रत्येक जिल्ह्याला १०० नंबर वा १०८ च्या धर्तीवर टोल फ्री नंबरची व्यवस्था निर्माण करावी. ज्यावर ऑक्सिजन बेड, व्हेटिलेटर या इतर माहिती कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना ताबडतोब व २४ तास मिळेल. त्यामुळे रुग्णांचा खोळंबा होणार नाही.
सध्या कोविड टेस्ट ( RTPCR ) चा रिपोर्ट चार दिवसानंतर मिळतो. तो त्याच दिवशी मिळणे गरजेचे आहे. रिपार्ट यायला चार दिवस लागल्यामुळे त्यामध्ये एखादा पॉझिटिव्ह असल्यास त्याला रिपोर्ट लगेच न समजल्यामुळे असा रुग्ण चार दिवस इतरत्र फिरत असतो, त्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाटयाने होतो. तसंच या चार दिवसांत अशा रुग्णांवर उपचार सुरु न झाल्यामुळे त्यांचा आजार बळावत जाऊन रिपोर्ट मिळेपर्यंत असा रुग्ण गंभीर झालेला असतो व ऐनवेळी त्याला व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोविड टेस्ट करनाऱ्या लॅब अजून बळकट करणं गरजेचं आहे.
कोविड रुग्णाणा रेमडेसीविर सांबत फेबीफ्ल्यू ( Febilue ) गोळ्यांची आवश्यकता दिवसदिवस वाढत आहे. प्रत्येक रुग्णास ७ दिवसांत साधारणतः ३४ गोळ्या घ्याव्या लागतात. ज्याची किंमत २५०० / – रुपये एवढी आहे. गरीब रुग्णांना हा औषधोपचार परवंडणारा नाही. त्यामुळे संदर औषधांचा पुरवठा सरकारी माध्यमातून करण्यात यावा.
सध्या गावागावात नागरिकांनी लसीकरणचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे अशा नागरिकाचा दुसरा डोस बाकी आहे. तरी यापुढे लसीकरण करताना ज्याचा दुसरा डोस बाकी आहे. अशा रुग्णांना दुसरा डोस दिल्यानंतरच १८ ते ४५ वयोगटाचा लसीकरणासाठी विचार करण्यात यावा.
सध्या कोरोना महामारीमध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यासाठी शासनाकडून शिक्षक, महसुल विभाग मधील कर्मचारी व वैद्यकिय क्षेत्राशी निगडीत नसलेल्या कर्मचाऱ्यांवर अनेक जबाबदा – या सोपविल्या जात आहेत. अनेक ठिकाणी होमिओपॅथी डॉक्टरांना सेवेमध्ये सामावून घेतले जात आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होमिओपथी डॉक्टर कोविड रुग्णची सेवा करण्यास तयार असूनही स्थानिक प्रशासनाकडून त्यांना सेवेत रुजू करून घेतले जात नाही. तसेच काहींना सेवेत रुजू करून घेतले त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे अशा होमिओपॅथी डॉक्टरांना तात्काळ सेवेत सामावून घेत आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी करावा अशी मागणी प्रमोद जठार यांनी केली आहे.

