*कोकण Express*
*घोणसरी उपकेंद्रात कोविड लसीकरनाचा शुभारंभ!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील घोणसरी उपकेंद्र येथे कोविड लसीकरण केंद्राचा शुभारंभ सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते पार पडला. तर सरपंच मृणाल पारकर, उपसरपंच विलास मराठे, प्रा.आ. केंद्र फोंडाघाट रुग्ण समिती सदस्य दीपक सावंत यांच्या मागणीला यश आले आहे. तसेच जि.प. अध्यक्षा संजना सावंत आणि सभापती मनोज रावराणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे हे केंद्र मंजूर करण्यात आले असून घोणसरी येथील लसीकरण केंद्रामुळे वयोवृद्ध नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास सभापती मनोज रावराणे यांनी व्यक्त केला.
लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना भाजपा कणकवली तालुका उपाध्यक्ष छोटू पारकर, तालुका सोशल मीडिया सदस्य नितीन पारकर आणि भाजपा बूथ सचिव कृष्णा पेडणेकर यांच्याकडून पाणी, बिस्कीटचे वाटप तर घोणसरीचे सुपुत्र आणि मुंबई बूथ क्र २०२ चे अध्यक्ष चंद्रकांत राणे यांच्याकडून चहा वाटप करण्यात आले.
यावेळी घोणसरी सरपंच मृणाल पारकर, विलास मराठे, भाजपा तालुका उपाध्यक्ष छोटू पारकर, भाजपा तालुका कार्यकारणी सदस्य लवू सावंत, भाजपा तालुका सोशल मीडिया सदस्य नितीन पारकर, रुग्ण समिती सदस्य दीपक सावंत, भाजपा ओबीसी सेल शक्तीकेंद्र प्रमुख दत्ताराम गुरव, भाजपा बूथ अध्यक्ष बाबू राणे, माजी उपसरपंच प्रसाद राणे, मिलिंद मराठे, कृष्णा पेडणेकर, अनिल राणे,विजय एकावडे, घोणसरी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.मराठे, घोणसरी उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना पाटील, आरोग्य सेवक शंकर राठोड, आरोग्यसेविका श्रीमती देवरुखकर, श्रीमती पेडणेकर आदी कर्मचारी, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

