तेली कुचकामी ठरल्यामुळे लोकांची दिशाभूल करत आहेत

तेली कुचकामी ठरल्यामुळे लोकांची दिशाभूल करत आहेत

*कोकण Express*

*तेली कुचकामी ठरल्यामुळे लोकांची दिशाभूल करत आहेत*

*कोरोना काळात राजकारण करण्यापेक्षा आरोग्यसेवा द्या*

*शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

शिवसेनेचे सर्वच नेते कोरोना रुग्णासाठी सेवा देण्याचे काम करत आहेत.मात्र भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली कुचकामी ठरल्यामुळे लोकांची दिशाभूल करत आहेत.त्यांचा खरा-खोटा चेहरा येथील जनता ओळखून आहे,अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे केली.दरम्यान कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत सहकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतः पुढे येणे गरजेचे आहे,मात्र ते टीका करण्यात धन्यता मानत आहेत.त्यामुळे या काळात राजकारण नको,तर आरोग्य सेवा देण्यासाठी पुढे या,असेही श्री.राऊळ यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!