पत्रकारांसाठी सावंतवाडी पालिकेकडून कोविड काळात पत्रकारांसाठी दहा राखीव बेड

पत्रकारांसाठी सावंतवाडी पालिकेकडून कोविड काळात पत्रकारांसाठी दहा राखीव बेड

*कोकण  Express*

*पत्रकारांसाठी सावंतवाडी पालिकेकडून कोविड काळात पत्रकारांसाठी दहा राखीव बेड…*

*सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

येथील पालिकेच्या माध्यमातून कोविड काळात सावंतवाडीतील पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी दहा बेड राखीव ठेवले जाणार आहेत. त्याची व्यवस्था लवकरच पालिकेच्या स्वतःच्या जागेत करण्यात येईल,असे आश्वासन सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिले.

दरम्यान रक्तदाता संघटना आणि सावंतवाडी पत्रकार संघ यांच्या माध्यमातून कोविडच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.असे त्यांनी सांगितले. येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री परब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत,राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर,जिल्हा परिषद सदस्य गुरुनाथ पेडणेकर, जिल्हा पत्रकार संघाचे संतोष सावंत, रामचंद्र कुडाळकर, अमोल टेंबकर,विजय देसाई,दीपक गावकर, जतीन भिसे,आशुतोष चिटणीस,सुनिल कविटकर,ओंकार सावंत,सुनिल मिशाळ, मेहर पडते, गौतम माठेकर, वसंत सावंत, अनिकेत पाटणकर,  राघवेंद्र चितारी, देवेश पडते, अभिजीत गवस, संदिप निवळे, पंकज तुळसुलकर, निखिल सावंत, अर्चित पोकळे, साईश निर्गुण,पांडुरंग वर्दम आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री परब म्हणाले, कोरोनाच्या काळात सर्वच संघटना चांगली सेवा देत आहे. या काळात पत्रकार संघ आणि रक्तदाता संघटना यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर कौतुकास्पद आहे,यावेळी त्यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या. तर हे शिबिर यशस्वी होण्यासाठी रक्तपेढीचे प्राजक्ता रेडकर, अनील खडे, सुजाता, बागेवाडी व डॉ. सुशांत वराडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!