कोविड रुग्णांसाठी मळेवाड कोंडुरे येथे तात्पुरते स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी तहसीलदार सावंतवाडी यांना निवेदन

कोविड रुग्णांसाठी मळेवाड कोंडुरे येथे तात्पुरते स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी तहसीलदार सावंतवाडी यांना निवेदन

*कोकण  Express*

*कोविड रुग्णांसाठी मळेवाड कोंडुरे येथे तात्पुरते स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी तहसीलदार सावंतवाडी यांना निवेदन …*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

मळेवाड कोंडूरे गावातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे स्वतंत्र तात्पुरते कोविड रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला असून या सेंटरच्या परवानगीसाठी तहसीलदार सावंतवाडी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनाला तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

सद्यस्थितीत कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने होत असून यामुळे शासकीय कोविड विलगीकरण सेंटरमध्ये रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होत नाहीत. यामुळे रुग्णांची परवड होत आहे. त्याचं बरोबर काही रुग्णांना टेस्ट केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो.मात्र त्यांना कोणतीही लक्षणे दिसून येत.अशा रुग्णांना फोन करून टाईम राहण्याचा सल्ला दिला जातो मात्र घरात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने त्याला गृह विलगीकरणात राहता येत नाही. त्यामुळे त्याला कोविड विलगीकरण सेंटरला पाठवण्यात येते. मात्र त्या ठिकाणी त्याल तात्काळ बेड उपलब्ध होत नाहीत.तसेच काही रुग्णांना किरकोळ स्वरूपाची लक्षणे दिसतात मात्र त्यांचा तात्काळ रिपोर्ट न मिळाल्याने जोपर्यंत रिपोर्ट येत नाहीत तोपर्यंत त्यांना सीसीसी सेंटर मध्ये दाखल करून घेतले जात नाही. या सर्व परिस्थितीचा विचार करून ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे व सदस्य यांनी घेतला असून यासाठी मळेवाड जकातनाका येथील राणी पार्वतीदेवी विद्यालय मळेवाड केंद्र शाळा नंबर १ मध्ये तात्पुरते सी सी सी सेंटर सुरू करण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देऊन परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.तसेच सदरच्या शाळेच्या वर्ग खोल्यांची इमारत ग्रामपंचायतच्या ताब्यात द्यावी अशीही विनंती केली आहे. सरपंच हेमंत मराठे यांच्या निवेदनावर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सकारात्मकता दर्शवली असून लवकरच परवानगी देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

या सेंटरला परवानगी मिळाल्यास मळेवाड कोंडूरे गावातील रुग्णांची परवड थांबणार असून असे सेंटर उभरणारी सावंतवाडी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!