*कोकण Express*
*जिल्ह्यात आज नव्याने ५२३ कोरोना पॉझिटिव्ह; सक्रीय रुग्ण ४ हजार १५१!*
*सिंधुदुर्गनगरी – ता. ७ :*
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ११ हजार ७६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात आज आणखी ५२३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

