*”सेवा अभियानातून जनतेशी थेट संवाद” अलिबागमध्ये आमदार प्रमोद जठार व संतोष साखरे यांनी स्वीकारली निवेदने*

*”सेवा अभियानातून जनतेशी थेट संवाद” अलिबागमध्ये आमदार प्रमोद जठार व संतोष साखरे यांनी स्वीकारली निवेदने*

*कोंकण एक्सप्रेस*

*”सेवा अभियानातून जनतेशी थेट संवाद” अलिबागमध्ये आमदार प्रमोद जठार व संतोष साखरे यांनी स्वीकारली निवेदने*

*अलिबाग :*

भारतीय जनता पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा अभियान’ अंतर्गत अलिबाग येथे नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजप कोकण विभागाचे संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता आमदार प्रमोद जठार आणि श्री. संतोष साखरे यांनी नागरिकांच्या विविध समस्या, मागण्या व प्रलंबित कामांबाबतची निवेदने स्वीकारली.

भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सेवा अभियानाचा मुख्य उद्देश सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या थेट पक्षाच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे हा आहे. यावेळी विविध विभागांशी संबंधित नागरिकांनी आपल्या समस्या मांडत निवेदने सादर केली.

आमदार प्रमोद जठार यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या तसेच संबंधित विषयांचा योग्य त्या पातळीवर पाठपुरावा करून समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ‘सेवा, संवाद आणि समस्या निराकरण’ या भावनेतून भाजप कार्यरत असून, नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचा प्रयत्न राहील, असे यावेळी सांगण्यात आले.

अलिबाग येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या या सेवा अभियानामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सेवा अभियानाच्या माध्यमातून जनतेशी असलेला थेट संवाद अधिक मजबूत होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

या सेवा अभियानास भाजप दक्षिण रायगड सरचिटणीस सतीश धारप, जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, भाजप ज्येष्ठ नेते गिरीश तुळपुळे, सरचिटणीस ॲड. महेश मोहिते, ज्येष्ठ नेते बिपीन म्हामुणकर, अलिबाग मंडळ अध्यक्ष रोशन भगत, अशोक वारगे, चेतन पाटील, आस्वाद पाटील, सुनील दामले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील, मंजुषा कुद्रीमोती, उदय काटे, प्रियदर्शिनी, प्राजक्ता दळवी, राजिप कृषी सभापती वैकुंठशेठ पाटील यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!