स्वातंत्र्यदिनाचा उत्साहात जल्लोष; विविध स्पर्धांतील गुणवंतांचा गौरव

स्वातंत्र्यदिनाचा उत्साहात जल्लोष; विविध स्पर्धांतील गुणवंतांचा गौरव

*कोंकण एक्सप्रेस*

*न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट  प्रशालेमध्ये*

*स्वातंत्र्यदिनाचा उत्साहात जल्लोष; विविध स्पर्धांतील गुणवंतांचा गौरव*

*फोंडाघाट : संजना हळदिवे*

न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट येथे 80 वा भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभही मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला.

स्वातंत्र्यदिनानिमित्त   मुख्याध्यापक श्री. प्रसाद पारकर यांच्या हस्ते प्रशालेमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् , ध्वजगीत , राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि ध्वज गीताचे सामाहिक गायन केले. प्रशालेतील एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करून ध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित केला. विविध घोषणांनी प्रशालेचा परिसर दुमदुमून गेला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान संचालक मा. श्री. संदेश सावंत-पटेल यांचच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. संजयजी आग्रे यांचे चिरंजीव आणि युवा उद्योजक श्री.युवराज आग्रे उपस्थित होते. तसेच श्री. चिन्मय मांगले, श्री. मंथन मर्ये, श्री. हर्षद खरात, मुख्याध्यापक श्री. प्रसाद पारकर व पर्यवेक्षक श्री. विजयकुमार राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला व ज्ञानाला वाव मिळावा या उद्देशाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि समूहगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तीन गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे, ज्ञानाचे व कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक श्री. प्रसाद पारकर यांनी प्रास्ताविकातून स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्वरूपाच्या स्पर्धांचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कै. वसंत आग्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फोंडाघाटचे उद्योजक मा. श्री. संजयजी आग्रे यांच्या वतीने सर्व स्पर्धांतील विजेत्या व गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि मेडल देऊन गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी श्री. युवराज संजय आग्रे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्यातील कल्पकता, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास विकसित करण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी भविष्यात विविध स्पर्धांमध्ये आत्मविश्वासाने सहभागी होऊन आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवावा, असे आवाहनही करण्यात आले. स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच निष्पक्ष व योग्य परीक्षण करणाऱ्या परीक्षकांचे मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. मसगे सर यांनी केले, तर उपस्थित मान्यवर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार श्री. राठोड सर यांनी मानले. राष्ट्रभक्ती, उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी भारलेल्या वातावरणात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!