वेंगुर्ला बाजारपेठेत नागाच्या मूर्त्या विक्रीसाठी दाखल

वेंगुर्ला बाजारपेठेत नागाच्या मूर्त्या विक्रीसाठी दाखल

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला बाजारपेठेत नागाच्या मूर्त्या विक्रीसाठी दाखल*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला बाजारात आज रविवारी बहुसंख्य नागोबाच्या मूर्त्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. साधारण दीड फुट उंचीची विक्रीसाठी दाखल झालेली नागोबाची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
श्रावण महिन्यात व्रतवैकल्ये आणि सणांची रेलचेल दिसून येते. नागपंचमीचा पहिलाच सण सोमवारी (दि.१७ ऑगस्ट) घरोघरी साजरा होणार आहे. गेले काही दिवस गणपतीच्या मूर्ती शाळांमध्ये तसेच काही हौशी मूर्ती कलाकार नागोबाच्या मूर्ती घडविण्यात व्यस्त होते. दरम्यान, आज रविवारी या मूर्त्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. बाजारपेठेमध्ये ठिकठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या लहान लहान नागाच्या मूर्त्या दृष्टीस पडत होत्या. आकर्षक रंगसंगतीने बनविण्यात आलेल्या मूर्त्या नागरिकांनी खरेदीही केल्या. तर आज रविवारी वेंगुर्ल्याचा आठवडा बाजार असल्याने दैनंदिन बाजारासोबतच नागपंचमी सणाच्या साहित्याचीही नागरिकांनी खरेदी केली.
फोटोओळी – वेंगुर्ला बाजारपेठेत दीड फुट उंचीची नागाची मूर्ती लक्ष वेधून घेत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!