जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते ध्वजारोहण*

*सिंधुदुर्गनगरी, दि.१५ :*

८० व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साही आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रभक्तीपर वातावरणात आणि भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी या कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!