एस.टी. महामंडळाच्या विविध समस्या संदर्भात बैठक

एस.टी. महामंडळाच्या विविध समस्या संदर्भात बैठक

*कोंकण एक्सप्रेस*

*एस.टी. महामंडळाच्या विविध समस्या संदर्भात बैठक*

*दिनांक : १३ ऑगस्ट २०२६*
*स्थळ : मा. अध्यक्ष कार्यालय*

*सिंधुदुर्गनगरी*

आज एस.टी. महामंडळाच्या विविध समस्या व प्रवाशांच्या अडचणींच्या संदर्भात मा. अध्यक्ष कार्यालयात संबंधित विभागीय नियंत्रक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

या बैठकीमध्ये ग्रामीण भागातील एस.टी. बससेवेचे वेळापत्रक, बसफेऱ्यांची संख्या, विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, बंद असलेल्या बसफेऱ्या तसेच आवश्यक असलेल्या नवीन बसफेऱ्या याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एस.टी. ही अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने प्रवाशांना वेळेवर व नियमित बससेवा उपलब्ध करून देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या शाळा-कॉलेजच्या वेळेनुसार आवश्यक बसफेऱ्या उपलब्ध करून देण्याबाबत विशेष चर्चा करण्यात आली.

नागरिकांच्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यावर लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील एस.टी. सेवा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!