उद्या १४ ऑगस्ट रोजी वेंगुर्ल्यात शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा

उद्या १४ ऑगस्ट रोजी वेंगुर्ल्यात शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा

*कोंकण एक्सप्रेस*

*उद्या १४ ऑगस्ट रोजी वेंगुर्ल्यात शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा*

*विशाल परब मित्रमंडळ आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस चे आयोजन*

*वेंगुर्ला  : प्रथमेश गुरव*

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार
आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विशाल परब मित्रमंडळ आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेंगुर्ला तालुकास्तरीय शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा – २०२६ उद्या, १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

वेंगुर्ला हायस्कूल येथे दुपारी २.३० वाजता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ला तालुक्यातील विविध प्रशालांमधील इयत्ता ५ वी ते ७ वी प्राथमिक गट तसेच इयत्ता ८ वी ते १० वी माध्यमिक गटातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुमधुर आणि सामूहिक स्वरातून राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासोबतच त्यांच्यामध्ये सांघिकता, शिस्त, आत्मविश्वास आणि राष्ट्रनिष्ठेची भावना रुजावी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध प्रशालांतील विद्यार्थी देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करणार असून, त्यांच्या स्वरांनी वेंगुर्ल्यातील वातावरण देशभक्तीच्या रंगात रंगणार आहे.

तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच नागरिकांनी या उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन विशाल परब मित्रमंडळ आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!