कोल्हापूर-तळेरे मार्गावर एडगाव येथे डपर पलटी होऊन अपघात

कोल्हापूर-तळेरे मार्गावर एडगाव येथे डपर पलटी होऊन अपघात

*कोंकण एक्सप्रेस*

*कोल्हापूर-तळेरे मार्गावर एडगाव येथे डपर पलटी होऊन अपघात*

*वैभववाडी  : प्रतिनिधी*

कोल्हापूर-तळेरे मार्गावर एडगाव-रामेश्वरवाडी येथे गुरे आडवी आल्याने चालकाचा डंपरवरील ताबा सुटून डंपर रस्त्याच्या बाहेर जाऊन पलटी झाला. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, डंपरचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा डंपर कोल्हापूरहून तळेरेच्या दिशेने जात होता. एडगाव येथे अचानक गुरे रस्त्यावर आडवी आल्याने चालकाचा डंपरवरील ताबा सुटला. त्यानंतर डंपर रस्त्याच्या बाहेर जाऊन पलटी झाला. अपघातावेळी डंपरमध्ये चालकासह तीन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुले प्रवास करत होती.

डंपर पलटी झाल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपरच्या केबिनमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना त्यांनी सुखरुप बाहेर काढले. सुदैवाने यातील कोणालाही दुखापत झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!