मा.आ. वैभव नाईक यांनी आ. सतेज (बंटी) पाटील व संजय पाटील यांचे केले सांत्वन

मा.आ. वैभव नाईक यांनी आ. सतेज (बंटी) पाटील व संजय पाटील यांचे केले सांत्वन

*कोंकण एक्सप्रेस*

*मा.आ. वैभव नाईक यांनी आ. सतेज (बंटी) पाटील व संजय पाटील यांचे केले सांत्वन*

*पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक*

*कोल्हापूर*

ज्येष्ठ शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांचे चिरंजीव आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व संजय पाटील यांची कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. डॉ. डी.वाय.पाटील यांनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा, समाजकारण आणि राजकारणात केलेले कार्य हे फार मोठे असून त्यांच्या निधनामुळे या सर्वच क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना वैभव नाईक यांनी व्यक्त केली. यावेळी उद्योजक प्रशांत पोकळे, स्वरूप कदम,संतोष गाडगीळ, विनय चौगुले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!