*कोंकण एक्सप्रेस*
*नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या माध्यमातून व वैभव मालंडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश*
*टेंबवाडी नागेश्वर मंदिर ते सुपरमार्केट रस्त्यावर पडला प्रकाश*
*कणकवली : संजना हळदिवे*
शहरातील टेंबवाडी येथील नागेश्वर मंदिर ते सुपरमार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर अखेर प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या माध्यमातून तसेच वैभव मालंडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या मार्गावर पथदिव्यांची व्यवस्था झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. या मार्गावर रात्रीच्या वेळी अंधार असल्याने नागरिक, महिला तसेच वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन वैभव मालंडकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करून या मार्गावर प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून दिली.
प्रकाश व्यवस्था झाल्याने टेंबवाडी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, नगराध्यक्ष संदेश पारकर आणि वैभव मालंडकर यांचे आभार मानले आहेत.
यावेळी वैभव मालंडकर, निलेश पवार, बंडू राणे, नयन यादव, ओंकार राणे, दुर्वांक मालंडकर, यश धुरी, पप्पू पेंडुलकर, राकेश पाल, प्रथमेश परब, विश्वनाथ चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

