*कोंकण एक्सप्रेस*
*कळसुली गावाची शेती समृद्ध करण्यासाठी एकत्र आले ग्रामस्थ*
*कृषी पदवीधर, अधिकारी आणि शेतकऱ्यांची महत्वपूर्ण बैठक…*
*कणकवली – प्रतिनिधी*
गावातील शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी साऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आज कळसुली ग्रामपंचायत हॉलमध्ये आयोजित बैठकीत करण्यात आले. दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ११:०० वाजता संपन्न झालेल्या या बैठकीत गावाची कृषी व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीची पार्श्वभूमी:
कळसुली गावच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील कृषी पदवीधर, शासकीय अधिकारी आणि शेतकरी यांनी पुढाकार घेतला आहे.
🟣या संयुक्त सभेचे प्रास्ताविक
शेतकऱ्यांचे स्वागत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ श्री. विजय दिनकर दळवी यांनी केले.
प्रमुख मार्गदर्शन आणि चर्चा:
बैठकीत उपस्थित मान्यवरांनी आपली मते मांडली:
🟣कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ विजय दिनकर दळवी: शेती विकासात येणाऱ्या तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा केली आणि समस्या सोडवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. सरकारी योजनांचा लाभ घेऊन सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास विकास साध्य करणे सोपे आहे. गावाची जुनी संस्कृती आणि आपुलकी टिकवून शेतकरी जगणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
🟣
श्री. प्रवीण राऊत: शेतकऱ्यांच्या कष्टाचे कौतुक करून त्यांनी आधुनिक अवजारे वापरून शेती करण्याचे महत्त्व पटवून दिले. सरकारी अनुदानाचा फायदा घेऊन विविध समस्या सोडवण्यासाठी आपले पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
🟣अधिष्ठाता उद्यानविद्या मुळदेचे डॉ. विजय विष्णू दळवी: शेतीचा विकास करताना अनेक तांत्रिक मुद्दे येणार आहेत, त्यावर आपण चर्चा करूया आणि त्या समस्या सोडवूया, मी या गावात लहानाचा मोठा झालो, शिकलो, या गावाचे मी देणे लागतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आपण सर्वांनी एकत्र येऊन वेगवेगळे गट (शेती )करून शासनाच्या योजनांचे फायदे घेत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विकास साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतीमध्ये खूप वाव आहे, गावाचा विकास झाला तर गावाबाहेर जाणारा युवक इथेच थांबेल आणि त्याचे योग्य ते अर्थार्जन होईल, असे त्यांनी सांगितले. गोवा मार्केट जवळ आहे, काही सामाजिक विषय आहेत जे सर्वांनी एकत्र येऊन आपण सोडवू शकतो. जुनी संस्कृती आत्मसात करा… यासाठी शेतकरी जगणे आवश्यक आहे, मी विकसित केलेल्या भाताच्या जाती येथील शेतकरी वापरत आहेत, हे पाहून मन सुखावले असल्याचे त्यांनी सांगितले. नकारात्मक दृष्टिकोन बाजूला ठेवून सकारात्मक दृष्टीने शेती कडे पाहिल्यास गावचा विकास करणे शक्य..
🟣डॉ. बाळकृष्ण गावडे: मी KVK चा प्रमुख आहे, शेतकऱ्यांनी प्रथम प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, आपण फळपीकणावर प्रक्रिया करणारे केंद्र सुरू केले आहे, शेतकरी आपले उत्पन्न वाढवून त्यावर प्रक्रिया केली तर योग्य नफा होऊ शकतो. परसातील कुक्कुटपालन, गोदुग्ध किंवा जिवामृत तयार करण्याचे प्रशिक्षण आपण देतो, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे सांगितले.
🟣
जिल्हा मृदा संधारण अधिकारी श्रीम. मुळे: मातीचे आरोग्य योग्य राखण्यासाठी त्याचे प्रथम परीक्षण केले पाहिजे, ते फक्त ३५ रुपयामध्ये उपलब्ध आहे. जिवामृत, दशपर्णी अर्क तयार केले पाहिजेत, तेव्हाच आपली जमीन सुधारेल, तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करणे आवश्यक आहे, आपल्या येथील केंद्राचा भेट देऊन त्याचा फायदा घ्यावा.
🟣
प.स.सदस्य प्रदीप गावडे… संपूर्ण पंचक्रोशीचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच रसायनांचा वापर कमी करून सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला. शेतीपुरक व्यवसाय सुरू करण्याचे महत्त्व त्यांनी पटवून सांगितले.
🟣डॉक्टर साक्षी सावंत: शासनाच्या ज्या विविध योजना आहेत, त्याची माहिती दिली.
🟣
श्री. प्रकाश दळवी : आज आपले विद्यार्थी शिकून मोठे झाले आणि ते गावाच्या विकासासाठी आपले योगदान देत आहेत, याचा मला आनंद आहे. शेतकऱ्यांनी घाईगर्दी न करता आज कृषी पदवीधारक पुढे आले आहेत, त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपला गावचा विकास साधावा, उत्तम वारंग सारख्या प्रगतिशील शेतकऱ्याचे मार्गदर्शन घ्यावे असे सांगितले.
🟣डॉ. एस एस दळवी: गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या दूध संकलन केंद्राचा शेतकऱ्यांना होणारा फायदा सांगितला आणि दुग्धोत्पादनाचे प्रशिक्षण घेण्याचे महत्त्व पटवून दिले.
🟣ठरलेले महत्त्वाचे मुद्दे:
बैठकीत गावाची शेती समृद्ध करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण उपक्रम ठरवण्यात आले:
गावातील कृषी पदवीधरांनी एकत्र येऊन १०-२० जणांचे गट स्थापन करणे
🟣 गावाच्या विकासात सक्रिय योगदान देणे.
पावसाचे पाणी अडवण्यासाठी उपाययोजना करणे आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे.
कुंपणाशिवाय शेती करण्याचा प्रयोग करणे आणि सहकारी सोसायट्यांचे आधुनिकीकरण करणे.
शेतकरी पुस्तकालयाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि शेतमालासाठी बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.
दूध व्यवसायात वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेणे.
🟣बैठक गावातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन आशा घेऊन कृषी विकासातून समृद्ध गाव बनवण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास कळसुली गाव शेतीच्या बाबतीत आत्मनिर्भर बनेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला
🟣सहभागी मान्यवर:
या बैठकीत खालील मान्यवर उपस्थित होते: विजय दिनकर दळवी,
अधिष्ठाता उद्यानविद्या मुळदेचे डॉ. विजय दळवी,
कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे शास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे ,जिल्हा मृद संधारण अधिकारी श्रीम मुळे, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश दळवी,सरपंच सचिन पारधिये, श्री. प्रवीण राऊत,,डॉक्टर साक्षी सावंत, डॉ.एस एस दळवी,कृषी अधिकारी श्रीम शेटे ,
श्रीम निरवडेकर ,
श्रीम जाधव,उत्तम वारंग, नि. स.वि.अधिकारी रामचंद्र जंगले, नि.पो.बापू खरात, श्री सावंत , बाळा कदम असे अनेक मान्यवर आणि 40 ते 45 शेतकरी ,ग्रामस्थ उपस्थित होते .

