*कोंकण एक्सप्रेस*
*महामानवांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम राबवा – प्रशांत गडकरी*
*ओरोस येथे भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर*
*सिंधुदुर्गनगरी*
समाजात असहिष्णूता वाढू नये यासाठी सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महामानवांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम राबविले पाहिजे, अशी अपेक्षा भारतीय बौद्ध महासभेच्या महाराष्टÑ शाखेचे कोषाध्यक्ष प्रशांत गडकरी यांनी व्यक्त केली.
भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग शाखा, महिला शाखा, समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध महासभा मिशन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात ५५ गावशाखा स्थापन करण्याच्या उद्देशाने कार्यकर्ता प्रशिक्षण प्रशिक्षण शिबीर ओरोस येथील माध्यमिक शिक्षक सहकारी पत्तसंस्थेच्या सभागृहात आ़योजित केले होते. याप्रसंगी श्री. गडकरी बोलत होत.
यावेळी मुंबई शाखेचे अध्यक्ष भिकाजी वर्देकर, भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, राज्याचे प्रचारपर्यटन अध्यक्ष उत्तम नगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य जोतिबा फुले, संत कबीर, संत रोहिदास, बिरसा मुंडा, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, माता रमाई यांच्यासारख्या महामानव यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राबविले पाहिजे, असे आवाहन मान्यवरांनी केले. यावेळी दहावी, बारावी, शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्यांच्या मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकाºयांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन संजय पेंडुरकर तर आभार सुषमा हरकुळकर यांनी केले.
या कार्यक्रमाला महिला जिल्हाध्यक्ष सुषमा हरकुळकर, महिला सचिव अपूर्वा पवार, कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, संस्कार उपाध्यक्ष आर.डी. चेंदवणकर, संरक्षण उपाध्यक्ष दिलीप तरंदळेकर, सचिव विलास वळंजू, संजय कांबळे, गुणाजी जाधव, समता सैनिक दलाचे मेजर अरुण जाधव, दीपक कांबळ, शंकर कदम, जे. पी. कदम, पं.ध. माणगावकर, आर. डी. कदम, जेनीकुमार कांबळे, विश्वनाथ कदम, महिला संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडुरकर, संचिता जाधव, कणकवली तालुका शाखचे अध्यक्ष भाई जाधव, रविकांत कदम, निलेश वर्देकर, चंद्रकांत म्हाणणकर, बुद्धभूषण हेवाळकर, सचिव रामचंद्र वालावलकर, महेंद्र कदम, प्रकाश पवार, सुभाष जाधव, बी. के. आयनोडकर, चंद्रशेखर जाधव, यांच्यासह जिल्ह््यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, समता दलाचे सैनिक उपस्थित होते.

