*”तुमचा चहा टाकून पुढे कोण जाईल?”— विरण नाक्यावर पालकमंत्री नितेश राणेंचा साधेपणा; कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव ताफा थांबवून घेतला चहा-भजीचा आस्वाद*

*”तुमचा चहा टाकून पुढे कोण जाईल?”— विरण नाक्यावर पालकमंत्री नितेश राणेंचा साधेपणा; कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव ताफा थांबवून घेतला चहा-भजीचा आस्वाद*

*कोंकण एक्सप्रेस*

*”तुमचा चहा टाकून पुढे कोण जाईल?”— विरण नाक्यावर पालकमंत्री नितेश राणेंचा साधेपणा; कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव ताफा थांबवून घेतला चहा-भजीचा आस्वाद*

*प्रशासकीय दौऱ्याच्या धावपळीतही जपली आपुलकी | जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचीही उपस्थिती*

*सिंधुदुर्ग प्रतिनिधी*

सत्तेचा आणि प्रोटोकॉलचा कोणताही अभिनिवेश न बाळगता जनतेत मिसळणे आणि कार्यकर्त्यांच्या हाकेला तात्काळ साद देणे, ही राणे कुटुंबाची ओळख पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. मसूरे येथील प्रशासकीय दौरा आटोपून कणकवलीकडे जात असताना, एका जेष्ठ कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपला सुरक्षेचा ताफा थांबवला आणि थेट हॉटेलच्या बाकावर बसून चहा-कांदा भजीचा अस्वाद घेतला. “तुमचा चहा टाकून पुढे कोण जाईल?” या पालकमंत्र्यांच्या उद्गाराने उपस्थितांची मने जिंकली.
नेमकी काय घडली घटना?
शुक्रवारी दिवसभर कणकवली, ओरोस, मालवण आणि मसूरे परिसरात विविध उद्घाटन व प्रशासकीय कार्यक्रमांचा झंझावाती दौरा आटोपून महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे कणकवलीच्या दिशेने निघाले होते. मसूरे येथील कार्यक्रम संपवून ताफा विरण नाक्यावरून जात असताना, खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक व माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अनिल कांदळकर हे आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर स्वागतासाठी उभे होते.
मंत्री महोदयांची गाडी दिसताच कांदळकर यांनी “साहेब, चहा घेऊनच जा!” अशी आपुलकीची साद घातली. सुरक्षेचा ताफा आणि मंत्रिपदाचे वलय बाजूला ठेवत नितेश राणे यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि “तुमचा चहा टाकून कोण पुढे जाईल?” असे म्हणत थेट कांदळकरांच्या हॉटेलमध्ये प्रवेश केला.
बाकावर बसून गप्पा अन् आस्थेने चौकशी
पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यासुद्धा उपस्थित होत्या. हॉटेलमधील लाकडी बाकावर बसून पालकमंत्र्यांनी अगदी घरच्यासारखा कुरकुरीत कांदा भजी आणि चहाचा आस्वाद घेतला. या वेळी त्यांनी उपस्थित स्थानिक ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडचणी व गार्‍हाणी जाणून घेतली.

“पद आणि अधिकार येतात-जातात, पण कार्यकर्त्यांच्या प्रेमाला दिलेला हा मानच राणे कुटुंबाला जनतेच्या हृदयात कायम स्थान मिळवून देतो.”
— उपस्थित ग्रामस्थांची प्रतिक्रिया

थानिकांकडून जल्लोषात स्वागत
या प्रसंगी अनिल कांदळकर, माजी सरपंच आपु आंबेरकर, विलास पांजरी, अजयकुमार सर्वगोड, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्यापासून सुरू झालेला हा जनसंपर्काचा वारसा आज आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे तितक्याच ताकदीने पुढे चालवत असल्याचे चित्र या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!