_बांधावरची शाळा_* *एक अभिनव उपक्रम

_बांधावरची शाळा_* *एक अभिनव उपक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*_बांधावरची शाळा_* *एक अभिनव उपक्रम*

*एक दिवस शेतक-यासाठी आपल्या अन्नदात्यांसाठी*

*सिंधुदुर्ग, दि. 31 (जिमाका):-*

बांधावरची शाळा एक दिवस शेतक-यासाठी, आपल्या अन्नदात्यासाठी” हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हयातील सर्व शाळांमध्ये होणार आहे. जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन १ ऑगस्ट रोजी सकाळी ०९:३० वा जि.प.पू.प्रा. केंद्रशाळा तेर्सेबांबर्डे नं. 1, ता. कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

या उपक्रमामध्ये प्रत्येक गावातील शेतक-यांनी, नागरीकांनी, विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी व पालकांनी शाळेच्या संयोजनाने त्या त्या गावामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. शेती व शेतक-याबद्दल आदर व्यक्त करावा, त्याच्या कष्टाचे कौतुक करावे, असे आवाहन शिक्षणअधिकारी ( प्राथमिक ) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

आपला देश हा कृषी प्रधान असून सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रत्येक गावात खूप चांगल्या प्रकारे शेती केली जाते. विदयार्थ्यांच्या मनात शेतकरी म्हणजेच बळीराजा बद्दल आदर निर्माण व्हावा, शेतीबद्दल आवड निर्माण व्हावी, शेतीचे महत्व कळावे, श्रमप्रतिष्ठा वाढावी, शेतीचे गणित, शेतीचे तंत्र, बी-बियाणे, खते, शेतीची आधुनिक अवजारे, किटकनाशके इत्यादीचा परिचय व्हावा, शेतीची प्रत्यक्ष अनुभुती मिळावी या हेतुने जिल्हा परिषदेमार्फत “बांधावरची शाळा- एक दिवस शेतक-यासाठी, आपल्या अन्नदात्यासाठी” हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हयातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमास जिल्हास्तरीय पदाधिकारी व अधिकारी सहभागी होणार आहेत. तसेच तालुकास्तरीय कार्यक्रमही सर्व तालुक्यांची ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!