मुंबई-गोवा महामार्ग पोलीस अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न: आरोपी अनंतराज पाटकर निर्दोष मुक्त

मुंबई-गोवा महामार्ग पोलीस अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न: आरोपी अनंतराज पाटकर निर्दोष मुक्त

*कोंकण एक्सप्रेस*

*मुंबई-गोवा महामार्ग पोलीस अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न: आरोपी अनंतराज पाटकर निर्दोष मुक्त*

*सिंधुदुर्गनगरी :*

मुंबई-गोवा महामार्गावर वाहन तपासणीदरम्यान महामार्ग पोलिसाच्या अंगावर कार घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गंभीर गुन्ह्यात अनंतराज नंदकिशोर पाटकर यांची जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१, सिंधुदुर्ग येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. हे वृत्त आज दि. ३१ जुलै २०२६ रोजी न्यायालयाकडून देण्यात आले असून, न्यायाधीश श्री. एस. टी. त्रिपाठी यांनी हा निकाल पारित केला आहे.
काय होता नेमका प्रकार?
सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल (गुन्हा रजि. क्र. ००६०/२०१९) करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, २२ सप्टेंबर २०१९ रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील पिटढवळ नदी पुलाजवळ महामार्ग पोलीस वाहन तपासणी करीत होते. यादरम्यान सीट बेल्ट न लावल्याने एका क्रमांकाची (⁠MH-०७-Q-९६१३⁠) एर्टिगा कार अडविण्यात आली होती.
आरोप होता की, चालकाने पोलिसांशी वाद घालून, ई-चलनाची कारवाई सुरू असतानाच वाहन वेगाने चालवत फिर्यादी महामार्ग पोलीस अंकुश बाबू नाईक यांच्या अंगावर घातले, तसेच सरकारी कामात अडथळा आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पुराव्याअभावी न्यायालयाने केली मुक्तता
या खटल्यात सरकार पक्षातर्फे फिर्यादीसह एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, सरकार पक्षाला संशयिताचा गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठोस व विश्वासार्ह पुराव्याद्वारे सिद्ध करता आला नाही.
बचावाच्या बाजूने युक्तिवाद करताना अॅड. अशपाक शेख यांनी सरकार पक्षाचा पुरावा विसंगत व आरोप सिद्ध करण्यास अपुरा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुराव्यांचा सखोल विचार करून न्यायालयाने अनंतराज नंदकिशोर पाटकर यांची निर्दोष मुक्तता केली.
कायदेशीर बाजू
प्रमुख वकील: अॅड. अशपाक शेख
सहाय्यक वकील: अॅड. नामदेव मठकर, अॅड. पंकज खरवडे, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख आणि अॅड. भूषण कदम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!