*कोंकण एक्सप्रेस*
*खोल समुद्रातील मच्छीमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा सुरू केल्याबद्दल*
*’गाबीत फिशरमन फेडरेशन’तर्फे मंत्री नितेश राणे आणि राज्य सरकारचे विशेष आभार*
*विष्णू मोंडकर अध्यक्ष गाबीत फिशरम फेडरेशन*
*मालवण : प्रतिनिधि*
महाराष्ट्रातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. नितेशजी राणे यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील मच्छीमारांसाठी ‘सॅटेलाईट फोन’ वितरण प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या अत्यंत कल्याणकारी निर्णयाबद्दल गाबीत फिशरमन फेडरेशन च्या वतीने मंत्री नितेशजी राणे व राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने ऐतिहासिक व सुरक्षित माध्यम खोल समुद्रात मासेमारी करताना अचानक हवामानात होणारे प्रतिकूल बदल, वादळ-वारा किंवा बोट नादुरुस्त होणे यांसारख्या गंभीर संकटांना मच्छीमारांना नेहमी सामोरे जावे लागते. अशा आपत्कालीन परिस्थितीत किनार्यावर, कुटुंबाशी किंवा मत्स्यव्यवसाय विभागाशी संपर्क साधण्यासाठी कोणतेही माध्यम उपलब्ध नसायचे. परंतु, बीएसएनएल (BSNL) च्या अत्याधुनिक सॅटेलाईट फोनमुळे आता खोल समुद्रात मोबाईल नेटवर्क नसतानाही मदतीसाठी त्वरित संपर्क साधता येणार आहे. हवामानाचा अंदाज घेणे असो किंवा बोट नादुरुस्त झाल्यावर तात्काळ मदत मिळवणे असो—या सॅटेलाईट फोनमुळे मच्छीमारांना थेट मदतीचे भक्कम माध्यम उपलब्ध झाले आहे.प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत
मत्स्यव्यवसाय विभाग आणि अंतर्गत मच्छीमारांना ही आधुनिक यंत्रणा उपलब्ध होणार आहे गाबीत समाज व तमाम मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे मच्छीमारांचा जीव वाचण्यास मोठी मदत होणार आहे.
गाबीत फिशरमन फेडरेशनचे आवाहन:
फेडरेशनतर्फे सर्व मच्छीमार बांधवांना आवाहन करण्यात येते की, लवकरच मच्छिमाराना मत्स्यसंपदा योजनेत याचा समावेश होणार असून मत्स्यव्यवसाय विभागाशी संपर्क साधून या शासकीय योजनेचा आणि सॅटेलाईट फोन सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी आणि संकटाच्या वेळी मदतीचे भक्कम माध्यम उभे केल्याबद्दल गाबीत फिशरमन फेडरेशन संपूर्ण मच्छीमार समाजाच्या वतीने मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे व राज्य सरकारचे पुनश्च आभार मानत आहे.अशी माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष गाबीत फिशरमन फेडरेशन यांनी दिली आहे

