अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव

अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव

*कोंकण एक्सप्रेस*

*अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव*

*कणकवली ः संजना हळदिवे*

शहरातील प. पू. नियादेवी अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रम येथे बुधवार २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वा. प. पू. भालचंद्र महाराज, फलाहारी बाबांच्या पादुकांचे पूजन, ११ वा. प. पू. देवी अनुसया माता यांच्या समाधीचे पूजन, दुपारी १२ वा. भजन, १ वा. आरती, तीर्थप्रसाद, १.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी प. पू. देवी अनुसया माता विश्रांती धाम महिला मंडळाचे भजन, रात्री ८.३० वा. शेज आरती होईल. तरी भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
…………..
कलमठ-बिडयेवाडीत गुरुपौर्णिमा उत्सव
कणकवली : कलमठ बिडयेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात बुधवार २९ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वा. पूजा, अभिषेक, लघरुद्र, लघुयाग व धार्मिक कार्यक्रम, दुपारी १२.३० वा. धुप आरती, सायंकाळी ५.३० वा. बिडयेवाडीतील १० व १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, सायंकाळी ७ वा. भजन, रात्री ८ वा. स्वामी समर्थांचे नामस्मरण, आरती होईल. तरी भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सेवेकरांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!