कणकवली इस्कॉन मंदिर येथे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

कणकवली इस्कॉन मंदिर येथे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली इस्कॉन मंदिर येथे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न*

*नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन*

*कणकवली ः संजना हळदिवे*

इस्कॉन कणकवली (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) यांच्या वतीने कणकवली इस्कॉन मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव रविवारी मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न झाला. नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

या महोत्सवात कणकवलीसह परिसरातील शेकडो भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून श्री जगन्नाथांचे दर्शन घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इस्कॉन कणकवलीच्या सर्व स्वयंसेवकांनी आणि भक्तांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमात साई प्रभुजी, प्रथमेश प्रभुजी, मनीषा कवठकर माताजी, संजय टकले प्रभुजी, अमलप्रिया माताजी, सागर आजगांवकर प्रभुजी, दाऊजी बलराम प्रभुजी, मनीषा धामापूरकर माताजी, योगिता रासम माताजी, रेखा राठोड माताजी, बोंडे माताजी, तायडे माताजी, श्रेया कसवणकर माताजी, सरुडकर माताजी आणि दिगंबर आढाव प्रभुजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!