*कोंकण एक्सप्रेस*
*मालवणच्या लक्ष्मीबाई टोपीवाला कन्या शाळेत ‘ह्यूमन राईट असोसिएशन’तर्फे वृक्षारोपण*
*मालवण ः प्रतिनिधी*
पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन (कोकण विभाग, सिंधुदुर्ग) च्या मालवण तालुक्याच्या वतीने स्थानिक लक्ष्मीबाई टोपीवाला कन्या शाळा येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळा परिसरात १० विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
या वृक्षारोपण कार्यक्रमास संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा महिला संघटक सौ. मिनल पार्टे, मालवण तालुकाध्यक्ष प्रमोद कांडरकर, उपाध्यक्ष महेश मयेकर, निरीक्षक संदेश फाटक, शहरी व ग्रामीण महिला संघटक मुक्ता रजपूत, सौ. सीमा धुरी, कार्याध्यक्ष सुभाष प्रभू खानोलकर आणि सदस्या सीलिया डिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ (मालवण) चे सहसचिव संदेश कोयंडे, कोषाध्यक्ष नंदन देसाई, लक्ष्मीबाई टोपीवाला कन्या शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण शिंदे, सहशिक्षक प्रवीण साबळे, कनिष्ठ लिपिक आनंद नाईक व शिपाई महादेव गावकर यांनी उपस्थित राहून या उपक्रमाला विशेष सहकार्य केले.
शाळा परिसरात झाडे लावून त्यांचे जतन करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. पर्यावरण रक्षणासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवणे ही काळाची गरज असून संघटनेच्या या पुढाकाराचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

