*कोंकण एक्सप्रेस*
*सायबरमुक्त आणि सुरक्षित जिल्हा बनवण्याच्या हेतूने सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन*
*कणकवली : गणेश इस्वलकर*
मंगळवार, दि. 30 जून 2026 रोजी आमच्या अ. वि. फडणीस माध्य. विद्यामंदिर घोणसरी, ता – कणकवली या प्रशालेत सुरक्षित सिंधुदुर्ग अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासन, MKCL सिंधुदुर्ग आणि सिंधुसंकल्प अकादमी यांच्या सौजन्याने सायबरमुक्त आणि सुरक्षित जिल्हा बनवण्याच्या हेतूने सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी फोंडाघाट पोलीस स्टेशन प्रमुख सन्मा. शिवगण साहेब, रचना कॉम्पुटर चे श्री. गणेश इस्वलकर तसेच इनसाईट कॉम्पुटर चे मालक श्री. प्रशांत वंजुळे हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मुख्या. श्री. राजम सर यांनी या मार्गदर्शक अतिथिंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
श्री. शिवगण साहेब यांनी मुलांना मोबाईल किंवा इंटरनेट च्या माध्यमातून अजाणतेपणाने आपण कसे सायबर क्राईमला बळी पडू शकतो, आपली कशी फसवणूक होऊ शकते, आपण का व कसे सावध राहायला हवे याबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले. मुलांमध्ये याविषयी व व्यवसनाधीनतेचे सामाजिक व अन्य तोटे याची जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी यावर आधारित ब्रीदवाक्य व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले गेले.
श्री. प्रशांत वंजुळे सर आणि श्री. गणेश इस्वलकर सर यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन द्वारे मुलांना सायबर क्राईम,AI चे महत्व, व्यसनाधिनतेचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.
श्रीम. तांबे मॅडम यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे आभार मानले.

