*कोंकण एक्सप्रेस*
*अत्तार सरांचे संगणकीय शैक्षणिक क्षेत्रात खूप मोलाचे कार्य आहे ; विजयकुमार कदम*
*शिरगाव हायस्कूलचे प्राचार्य एस. एन. अत्तार यांचा सेवानिवृत्ती पर सोहळा*
*शिरगांव : संतोष साळसकर*
अत्तार सरांनी संगणकीय क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली आहे. त्यांची संशोधनाची वृत्ती खरंच खूप उच्च पातळीवर आहे. त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग शिरगाव हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना मिळाला. तसेच त्यांची उच्च तंत्रज्ञान मध्ये उतुंग भरारी आहे. त्यांनी शिक्षकीय पेशीमध्ये प्रामाणिकपणे काम केले त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे ते शिक्षकीय पेशेमधून जरी सेवानिवृत्त झाले असले तरी या संस्थेचे ते कायमच अविभाज्य घटक असतील. असे शिरगांव हायस्कुल शाळा समिती चेअरमन तथा माजी प्राचार्य विजयकुमार कदम यांनी अत्तार सरांना सेवानिवृत्ती पर कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या.
देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल शिरगाव चे मुख्याध्यापक शमशुद्दीन अत्तार यांचा सेवानिवृत्ती पर कार्यक्रम प्रसंगी माजी प्राचार्य विजयकुमार कदम हे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी या हायस्कूलचे कर्मचारी प्रवीण शेट्ये, आणि प्रताप मोरे यांचाही सेवानिवृत्ती पर कार्यक्रम होता. याप्रसंगी शिरगाव हायस्कूल शाळा समिती चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, वरिष्ठ महाविद्यालयाचे मानद अधीक्षक सुधीर साटम, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिलीप पाळेकर, ज्येष्ठ बालनाट्य दिग्दर्शक डॉ. राजेंद्र चव्हाण, डॉ.र राजेंद्र पारकर, गणेश साळगावकर, विठोबा लब्दे, चंद्रशेखर आचरेकर, पेंढरी हायस्कूलचे मुख्याध्यापक सत्यपाल लाडगावकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र वाळके, कोळोशी – हडपिड हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक डी. बी. करडे, ताजुनबी अत्तार, नाझनीन अत्तार, सलीम अत्तार, हिदायन अत्तार, राजेंद्र शेट्ये, नूतन मुख्याध्यापक उदयसिंग रावराणे, नागेश पवार आदींसह संस्थेचे इतर पदाधिकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने सेवानिवृत्त प्रा. शमशुद्दीन अत्तार, कर्मचारी प्रवीण शेट्ये, प्रताप मोरे यांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि कुलर भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी पालक, विध्यार्थी तसेच शिक्षक यांनीही त्यांना वैयक्तिक भेट वस्तू देऊन त्यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्कार मूर्ती सेवानिवृत्त प्राचार्य अत्तर सर म्हणाले की माझे बाबा आदर्श शिक्षक होते. गेली 35 वर्षे मी माझ्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या शिक्षकीपेशेत काम केले. मी नोकरी करीत असताना कधीच माझ्या संसाराचा विचार केला नाही माझ्या पत्नीने पूर्णपणे घर सांभाळले. तिची मला खूप मोलाची साथ मिळाली. मी नोकरी करीत असताना याच शिरगावात घडलो त्यामुळे या संस्थेचे आणि या गावाचे मी कायम ऋणी असेन.
या संस्थेचे मानद अध्यक्ष संदीप साटम याने अत्तार सरांच्या कार्याबद्दल गौरोवदगार काढले. आपले आरोग्य चांगले असेल तरच या जगात आपल्या जीवनाचं खरं मूल्य आहे. त्यामुळे मुलांनी आपले आरोग्य जपावे. असा सल्ला दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर करडे यांनी तर आभार प्रदर्शन सरस्वती धुरी यांनी मांडली.

