*कोंकण एक्सप्रेस*
*चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत मधुरा बाईतचे यश*
*कणकवली ः संजना हळदिवे*
शहरातील छ. शिवाजी महाराजनगर येथे राहणारी कु. मधुरा रवींद्र सुषमा बाईत हिने चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. कु. मधुरा हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण वरवडे येथील सेंट उर्सुला स्कूल येथे झाले. त्यानंतर पुढील वाणिज्य शाखेच्या पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत पोदार कॉलेज येथे झाले. हे शिक्षण घेतानाच कु. मधुरा हिने सीएचाही अभ्यास सुरू ठेवला होता. गुरुवारी जाहीर झालेल्या चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेच्या निकालात कु. मधुरा हिने उज्ज्वल यश प्राप्त केले. कु. मधुरा हिचे वडील सिंधुदुर्ग पोलीस विभागात वैभववाडी येथे कार्यरत आहेत. तर आई सुषमा या स्मार्ट कोचिंग व मधुरा कॉम्युटर क्लासेस चालवतात. कु. मधुरा हिच्या सीए परीक्षेतील यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

