इस्रो उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धेत पेंडूर हायस्कूलचे यश

इस्रो उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धेत पेंडूर हायस्कूलचे यश

*कोंकण एक्सप्रेस*

*इस्रो उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धेत पेंडूर हायस्कूलचे यश*

*मालवण ः प्रतिनिधी*

इस्रो बाल वैज्ञानिक लेखी व मुलाखत दोन्ही स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून निवड झालेल्या 50 विद्यार्थ्यांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरुची विद्यार्थिनी कुमारी प्रिया विलास पेंडुरकर हिने राज्यात 8वा.क्रमांक पटकावला असून इस्रो दौऱ्यासाठी तिची निवड झालीनिवड आहे. तसेच साईश संतोष हिंदळेकर, सौजन्या सावंत ,समृद्धी सहदेव गावडे, मनस्वी शैलेश परब, भूमी दिनेश परब हे सर्व विद्यार्थी गोल्ड मेडल चे मानकरी ठरले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना सौ अर्चना देसाई मॅडम, सौ संजना पाटकर मॅडम, श्री संगम चव्हाण सर, सौ प्रज्ञा कदम मॅडम, सौ सुजाता सावंत मॅडम, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री तावडे सर शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष श्री बाबाराव राणे, संस्था सचिव श्री घन:श्याम राणे, सर्व संस्था चालक, पालक व ग्रामस्थ यांचे प्रोत्साहन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!