कळसुली हायस्कूलची १००% निकालाची परंपरा कायम*

कळसुली हायस्कूलची १००% निकालाची परंपरा कायम*

*कोंकण एक्सप्रेस*

*कळसुली हायस्कूलची १००% निकालाची परंपरा कायम*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी ) फेब्रु./मार्च २०२६ चा निकाल १००% लागला असून प्रशालेच्या १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे . सदर परीक्षेसाठी एकूण ४६ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. यात प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.

प्रथम क्रमांक – कु. भूषण प्रमोद दळवी (गुण – ४६८, शेकडा गुण – ९३.६० %)

द्वितीय क्रमांक – कु. मेघा प्रविण दळवी(गुण – ४४८, शेकडा गुण – ८९.६० %)

तृतीय क्रमांक – कु. मयुरेश सुरेश धुरी( गुण – ४४५, शेकडा गुण – ८९.००% )

तृतीय क्रमांक – कु. वेदिका रघुनाथ मेस्त्री(गुण – ४४५, शेकडा गुण – ८९.००% )

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. सूर्यकांत राजाराम दळवी, कार्याध्यक्ष – श्री. विजय पांडुरंग सावंत, सरचिटणीस- श्री. जय मारुती दळवी, सल्लागार – श्री. प्रकाश दळवी, सर्व संस्था पदाधिकारी तसेच स्कूल कमिटी चेअरमन – श्री. के. आर. दळवी, व्हाईस चेअरमन – श्री. नामदेव घाडीगावकर, सदस्य – श्री. रजनीकांत बळीराम सावंत, सदस्या – सौ. शुभदा देसाई व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष- श्री. अनिल सावंत, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष – श्री. भालचंद्र रघुनाथ दळवी व पदाधिकारी, मुख्याध्यापक – श्री. व्ही. व्ही. वगरे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक व हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!