*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.९८ टक्के*
*३० पैकी २० शाळांचा निकाल १०० टक्के विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*
*कणकवली ः संजना हळदिवे*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा यावर्षीचा दहावीचा कणकवली तालुक्याचा निकाल ९७.९८ टक्के लागला आहे. तालुक्यात दहावीच्या परीक्षेसाठी १४४० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १४३६ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. त्यापैकी १४०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ७५३ मुले व ६८३ मुलींचा समावेश होता. यामध्ये ५३९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. तर ५०० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३०८ द्वितीय श्रेणीत तर ६० विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील ३० शाळांपैकी तब्बल २० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
शाळानिहाय निकाल
एस.एम. हायस्कूलचा ९२.८५ टक्के, विद्यामंदिर प्रशालेचा ९८.१७ टक्के, खारेपाटण हायस्कूलचा ९७.१६ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल ९९.१ टक्के, कनेडी हायस्कूल १०० टक्के, इंग्लिश स्कूल कळसुलीचा १०० टक्के, कासार्डे हायस्कूलचा ९७.१९ टक्के, नरवडे इंग्लिश हायस्कूलचा १०० टक्के, सरस्वती हायस्कूल नांदगाव १०० टक्के, हरकुळ खुर्द विद्यामंदिर १०० टक्के, ल. गो. सामंत हायस्कूल ९४. ७३ टक्के, वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय ९५.९१ टक्के, नाथ पै प्रबोधिनी करूळ हायस्कूलचा १०० टक्के, शिवडाव माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के, आदर्श विद्यामंदिर सावडावचा १०० टक्के, नाटळ माध्यमिक विद्यालय ९५.५५ टक्के, बिडवाडी माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के, श.म. विद्यालय, कुंभवडेचा १०० टक्के, घोणसरी माध्यमिक विद्यालय १०० टक्के, न्यू इंग्लिश स्कूल ओसरगाव-बोर्डवेचा १०० टक्के, शेर्पे माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के, शेट एम. व्ही. केसरकर माध्यमिक विद्यालय वारगाचा १०० टक्के, हरकुळ बुद्रुक उर्द हायस्कूलचा १०० टक्के, आदर्श विद्यामंदिर करंजेचा १०० टक्के, लोरे-वाघेरी विद्यामंदिराचा १०० टक्के, सेंट उसुर्ला हायस्कूल, वरवडेचा १०० टक्के, नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवेचा ९१.६६ टक्के, बाल शिवाजी इंग्लिश स्कूल, जानवलीचा १०० टक्के, आयडियल न्यू इंग्लिश मीडियम, वरवडे ९८.३६ टक्के, विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल कणकवलीचा १०० टक्के निकाल लागला आहे.
विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद –
दहावीचा निकाल आज जाहिर झाला आहे. निकाल ऑनलाईन पाहताच यशस्वी विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हास्य फुलले होते. कणकवली येथे 10 वी उत्तीर्ण झालेल्या उत्साही विद्यार्थ्यांनी एकत्र येत फटाके फोडून लाडू भरवत जल्लोष केला. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींच्या चेह-यावर दहावीतील मिळालेले यश ऑनलाईन निकाल पाहिल्यानंतर दिसून येत होते.

