साळशी येथील श्री गांगेश्वर विठ्ठलाई देवी कुलदेवता मंदिराचा ९ मे रोजी वर्धापनदिन सोहळा*

साळशी येथील श्री गांगेश्वर विठ्ठलाई देवी कुलदेवता मंदिराचा ९ मे रोजी वर्धापनदिन सोहळा*

*कोंकण एक्सप्रेस*

*साळशी येथील श्री गांगेश्वर विठ्ठलाई देवी कुलदेवता मंदिराचा ९ मे रोजी वर्धापनदिन सोहळा*

*यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील साळशी-परबवाडी येथील श्री गांगेश्वर विठ्ठलाई देवी सेवा संस्था यांच्या वतीने श्री गांगेश्वर विठ्ठलाई देवी कुलदेवता मंदिराचा आठवा वर्धापनदिन सोहळा शनिवार, ९ मे रोजी संपन्न होणार आहे.

या वर्धापनदिनानिमित्त ७ ते ९ मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ७ मे रोजी सकाळी ९ वाजता सभामंडप व परिसर सुशोभीकरणाचे उद्घाटन होणार आहे. ८ मे रोजी सकाळी ८ वाजता मूर्ती स्थापना करण्यात येणार आहे.

९ मे रोजी सकाळी ९ वाजता अभिषेक, सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ६ वाजता स्थानिक भजनांचा कार्यक्रम, सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री १० वाजता श्री देव कुदळेश्वर महिला दशावतार नाट्य मंडळ, कुडाळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

या कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री गांगेश्वर विठ्ठलाई देवी मंडळ साळशी (परबवाडी), श्री देव सिद्धेश्वर पावणाई इनाम देवस्थान ट्रस्ट साळशी तसेच बारा-पाच मानकरी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!