*कोंकण एक्सप्रेस*
*इंग्लिश स्कूल भेडशी कॉलेजचा बारावी निकाल जाहीर; सोनिया गवस वाणिज्य शाखेत प्रथम…*
*दोडामार्ग :शुभम गवस*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निकालात न्यू इंग्लिश स्कूल भेडशी कॉलेजने समाधानकारक यश संपादन केले.
कॉलेजमधील वाणिज्य शाखेत सोनिया अर्जुन गवस हिने ८५.८३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. ऐश्वर्या सगुण नाईक हिने ७६.५० टक्के गुणांसह द्वितीय, तर तन्मय रमेश लोंढे याने ७२.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
या वर्षी कॉलेजमधून एकूण ४१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेत आकांशा काशिनाथ च्यारी हिने ५४.८३ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. सिया चंद्रकांत नाईक हिने ५२.१७ टक्के गुणांसह द्वितीय, तर रोशन सखाराम देसाई याने ५१.५० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे कॉलेजतर्फे तसेच तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.

