*कोंकण एक्सप्रेस*
*कुवळे येथील संदीप कुवळेकर यांचे निधन*
*शिरगांव / संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील कुवळे आगरवाडी येथील संदीप राजाराम कुवळेकर ( वय 42 ) यांचे गुरुवार दि. 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मुंबई नालासोपारा येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 विवाहित बहिणी, एक मामा, मामी, भावोजी, चुलत भाऊ, मामे भाऊ, भाचे, भाची असा परिवार आहे.पत्रकार संतोष साळसकर यांचे ते मेव्हणे होत.

