राणे साहेबांच्या स्वप्नातील बँकेच्या पारदर्शक कारभाराला चालना देण्याचे काम मनीष दळवी करत आहेत: नितेश राणे*

राणे साहेबांच्या स्वप्नातील बँकेच्या पारदर्शक कारभाराला चालना देण्याचे काम मनीष दळवी करत आहेत: नितेश राणे*

*कोंकण एक्सप्रेस*

*राणे साहेबांच्या स्वप्नातील बँकेच्या पारदर्शक कारभाराला चालना देण्याचे काम मनीष दळवी करत आहेत: नितेश राणे*                   

*जिल्हा बँक शिरगांव शाखा स्थलांतर सोहळा संपन्न*  

*शिरगांव : संतोष साळसकर*

जिल्ह्यातील तरुणांना माता-भगिनींना, व्यावसायिकांना मी आव्हान करतो आपण आर्थिक नियोजन करा. दुपटीने मोठे पाऊल टाकण्याचा निर्धार करा. सिंधुदुर्ग जिल्हा बँक तुमच्या पाठीशी सदैव उभी राहील. तुम्ही फक्त स्वप्न पहा,आर्थिक नियोजन करा, उलाढाल होण्याच्या दृष्टीकोन पाऊल टाका तुमच्या मागे कसे राहायचे याची पूर्ण तयारी आमची आहे. आपल्या सर्वांच्या मनातील दुहेरी विचार कुठे ना कुठे तरी थांबला पाहिजे. ही माझी हक्काची बँक आहे म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडे पाहिले पाहिजे. राणे साहेबांचा नेहमी आग्रह असतो बँकेचा कारभार नेहमी पारदर्शक झाला पाहिजे त्यात कुठेही तडजोड करता नये. सिंधुदुर्ग जिल्ह्यावर, कोकणावर राणे साहेबांचे प्रेम आहे. त्याला खऱ्या अर्थाने चालना देण्याचे काम मनीष दळवी बँकेच्या माध्यमात करत आहेत. त्यांना साथ द्या असे आवाहन नाम नितेश राणे यांनी शिरगांव येथे केले सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिरगांव शाखा स्वमालकिच्या नुतन इमारतीचा स्थलांतर सोहळा संपन्न झाला. नुतन शाखा इमारत स्थलांतर सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग नामदार नितेश राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,बँक संचालक प्रकाश बोडस,संदिप साटम,अँड प्रसाद करंदिकर,जि.प. सदस्य देवदत्त कदम, शिरगाव प.स. सदस्य शीतल तावडे, तळवडे प.सं सदस्य सलोनी तळवडेकर, शिरगाव वि. सोसा. चेअरमन विश्राम लोके साळशी वि. सोसा. चेअरमन सत्यवान सावंत, हडपीड वि.सोसा. चेअरमन रामचंद्र राणे,तोरसोळे वि. सोसा.चेअरमन अरविंद पवार,महाळुंगे नाद वि सोसा.चेअरमन सुरेश राणे,तळेबाजार वि. सोसा. चेअरमन सदानंद देसाई, जिल्हा बँकेचे प्र.मुख्य कार्य अधिकारी दिवाकर देसाई,प्रशासन सरव्यवस्थापक शरद सावंत,झेप सरव्यवस्थापक नितीन सावंत,शिरगांव शाखा व्यवस्थापक बापू शेळके,तालुका विकास अधिकारी संजय घाडी , विकास अधिकारी संजय परबजिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी शिरगांव चे ग्रामस्थ, ग्राहक,ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मनीष दळवी म्हणाले राणे साहेबांनी आमच्यासमोर सातत्याने एक गोष्ट मांडलेली आहे जेव्हा जेव्हा तुम्ही जिल्हा बँक म्हणून जिल्हा बँकेच्या प्रगतीचा विचार कराल तेव्हा जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे जिल्ह्यात बँकेची जशी प्रगती होत जाईल तस तसा या जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेत्या प्रगती मध्ये सुद्धा बँकेचा हातभार राहिला पाहिजे या दृष्टीने बँकेने काम केलं पाहिजे.बँकेने फक्त व्यवसायात वाढ केली नसून तर व्यवसाय वाढीबरोबर बँकेला नफा सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला आहे. बँक सक्षमपणे उभी राहिली आहे.जिल्ह्यातील सर्व सामान्य शेतकरी, व्यापारी विद्यार्थी, महिला या सर्वांना डोळ्यासमोर बँक काम करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!