वेंगुर्ले आगारातील वाहक चंद्रकांत रजपुत यांचा भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाच्या वतीने सेवानिवृत्तीपर सत्कार

वेंगुर्ले आगारातील वाहक चंद्रकांत रजपुत यांचा भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाच्या वतीने सेवानिवृत्तीपर सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ले आगारातील वाहक चंद्रकांत रजपुत यांचा भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाच्या वतीने सेवानिवृत्तीपर सत्कार.* 

वेंगुर्ला आगाराचे वाहक ज्यांनी राप महामंडळात गेली ३७ वर्ष सेवा दिली असे श्री चंद्रकांत रजपूत यांच्या सेवा निवृत्ती समारंभा वेळी त्यांना भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारातर्फे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तसेच आगार अध्यक्ष श्री प्रसन्ना देसाई यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छ्या दिल्या .

यावेळी सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ विभागीय सचिव श्री भरत चव्हाण, वाहतूक निरीक्षक श्री तेजस तारी,निवृत कर्मचारी श्री इम्तियाज राजगुरू, श्री स्वप्नील रजपूत, श्री सखाराम सावळ, श्री प्रवीण रेवणकर, श्री आर. पी. पालकर हे उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!