सामाजिक बांधिलकी जपत निशिकांत कडुलकर यांचा वाढदिवस साजरा

सामाजिक बांधिलकी जपत निशिकांत कडुलकर यांचा वाढदिवस साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*सामाजिक बांधिलकी जपत निशिकांत कडुलकर यांचा वाढदिवस साजरा*

*दिविजा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या*

*कणकवली ः संजना हळदिवे*

वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छा आणि जल्लोष नव्हे, तर समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे, याचा प्रत्यय सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आला. निशिकांत कडुलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असणाऱ्या विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांनी ज्येष्ठांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. आपुलकी, स्नेह आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला.

वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे वृद्धाश्रम परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी केदार खोत, दीपेश सावंत, ज्ञानेश्वर यादव, शुभम पवार, चिन्मय जामसांडेकर, शुभम पोयेकर, सचिन आडूळकर, निनाद नाडकर्णी, अक्षय कुलकर्णी, संदीप वाळके, प्रांजल भिसे, पप्पू निमणकर आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता जपत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!